70 वर्ष काय केलं? हा प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रम्प यांनी भाषणातू

  • काँग्रेसने गेल्या 70 वर्षांत काय केलं? हे भाजप सातत्याने विचारत आला आहे. त्यांच्या याच प्रश्नाचं उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्याचं काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारताने गेल्या 70 वर्षात लोकशाही मजबूत केली, असं म्हटलं. हाच दाखला देत काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं हा प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रम्प यांनी उत्तर दिलं आहे, असं चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले. पंतप्रधान मोदींनी त्यांचं मोठ्या आदराने स्वागत केलं. साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे मोटोरा स्टेडियममध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी भारताची विविधतेत असलेली एकता, भारतीय सण, भारतीय खेळ, भारताचे महामानव यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला. दरम्यान, भारताने केलेला पाहुणचार आहम्ही नेहमी लक्षात ठेवू. भारतासाठी आमच्या अंतःकरणात विशेष स्थान आहे, अशाही भावना ट्रम्प यांनी व्यक्त केल्या.