पडळ, ता. खटाव, जि.सातारा येथील के. एम. शुगर साखर कारखान्याच्या २ लाख ५१ हजाराव्या साखर पोत्याचे पूजन आज होतेय.

  • पडळ, ता. खटाव, जि.सातारा येथील के. एम. शुगर साखर कारखान्याच्या २ लाख ५१ हजाराव्या साखर पोत्याचे पूजन आज होतेय. एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत. प्रभाकर देशमुख,प्रभाकरराव घार्गे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक धाडस केले व खटाव तालुक्यात हा तिसरा कारखाना काढला. काही वर्षांपूर्वी साखर कारखाना उभारण्याची मनिषा त्यांनी मला सांगितली. मी विचारलं ऊस कुठून आणणार? ते म्हणाले ऊस बक्कळ आहे. मी विचारलं ऊसासाठी पाणी कुठून येणार, त्यांनंतर त्यांनी या दुष्काळी भागातली पाण्याची अडचण सोडविण्याचा प्रयत्न केलाय. पण अजून पाण्याची गरज पूर्णतः भागलेली नाही. आज इथे ३५०० हजार टन गळीत क्षमतेचा कारखाना उभा केलाय, याचा अर्थ तो ४५००-५००० हजार टन गळीत क्षमतेचा करता येईल. कारण क्षमतेपेक्षा अधिक गाळप केल्याशिवाय अनेकदा व्यवसाय परवडत नाही. त्यामुळे इथे शेती क्षेत्र वाढण्याची गरज आहे. आणि यासाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. पण जास्त चिंता करण्याची गरज नाही. इथला बहादुर शेतकरी संकटावर मत करून कारखान्याच्या गरजेइतका ऊसाचा पुरवठा केल्याशिवाय राहणार नाही. आज राज्यातील परिस्थिती बदलली आहे, बदललेल्या स्थितीचा फायदा आपल्या भागासाठी करून घेण्याची गरज आहे. यासाठी पुढील दहा दिवसात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन आपण सगळे या दुष्काळी प्रश्नावर योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. रामराजे निंबाळकर यांचा या विषयाबाबत उत्तम अभ्यास आहे, त्यांच्या उपस्थितीत या बैठकीत मार्ग काढू. मार्ग काढल्यावर जे घडत नाही ते घडवण्याचे काम मी करेन. आणि आपल्या भागात एकदा पाणी आले की ऊसाची कांडं कुठे लावायची हे सांगायची गरज लागत नाही. आता फक्त साखरेचा विचार करायचा नाही. साखरेसोबत मळीतून पेट्रोलसाठी इथेनॉल व वीज निर्मिती करण्याचे काम करायचे आहे. यातून शेतकऱ्याला दोन पैशांचा अधिक फायदा होईल. मला आनंद आहे की या कारखान्यात याबाबत विचार केला गेलाय. यातून हा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही. ऊस, साखर, इथेनॉल, वीज या विषयांबाबत अभ्यास करणाऱ्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. येत्या ३१ तारखेला जगातील २२ देशातून ऊसाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन पुण्यात मांजरी येथे एक आंतरराष्ट्रीय परिषद घेणार आहेत. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. १ एकर ऊसाला पाटाने पाणी देताना बरेच पाणी वाया जाते. ठिबक सिंचन पद्धतीने ३ एकर शेतीला या पाण्याचा लाभ होतो. मात्र हे खर्चिक असल्याने माझी सरकारला मागणी आहे की धरणावर या कारखान्यात ७० लोक तीन पाळ्यांमध्ये काम करतात. राज्यात अनेक कारखान्यांमध्ये गरजेपेक्षा अधिक कामगार भरण्याची पद्धत आहे. गरजेपेक्षा अधिक कामगारभरती हा कारखान्यांपुढचा मुख्य प्रश्न आहे. इथे ७०च्या वर कामगार नाहीत याचा आनंद आहे. त्यामुळे हा कारखाना १०० टक्के यशस्वी होईल. https://t.co/DZndvl4cfe खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना पुरवण्याचे काम करावे. आज युरोपमध्ये बिटापासून साखर निर्माण केली जाते. आपल्या देशात असे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. बीट हे सहा महिन्यांचे पीक आहे व त्यात साखरेचे प्रमाणही जास्त असते. याबाबतचा अभ्यास सुरू आहे, लवकरच त्यावर मार्ग निघेल. या कारखान्यात ७० लोक तीन पाळ्यांमध्ये काम करतात. राज्यात अनेक कारखान्यांमध्ये गरजेपेक्षा अधिक कामगार भरण्याची पद्धत आहे. गरजेपेक्षा अधिक कामगारभरती हा कारखान्यांपुढचा मुख्य प्रश्न आहे. इथे ७०च्या वर कामगार नाहीत याचा आनंद आहे. त्यामुळे हा कारखाना १०० टक्के यशस्वी होईल.