Photo 132 of 428 in Wall Photos

Pin It
अखेर नाफेडने उद्दिष्ट वाढविले.....खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत, नाफेडने हरभरा खरेदी बंद केली होती. त्यामुळे नोंदणी केलेले कित्येक शेतकरी नाफेडच्या खरेदी पासून वंचित आहे. आता नाफेडने खरेदीचे उद्दिष्ट वाढवित बुधवारपासून हरभरा खरेदी पूर्ववत सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे १८ जून पर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे.नाफेडकडून सर्वप्रथम हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची खरेदी पूर्व ऑनलाइन नोंदणी केली गेली. त्यानंतर १ मार्च पासून नाफेडच्या खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष हरभरा खरेदी सुरू झाली. मात्र २४ मे रोजी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत नाफेडने हरभरा खरेदी बंद केली होती.

त्यामुळे राज्यभरातील शेतकरी हरभरा अडचणीत उत्पादक सापडले.शासनस्तरावर पाठपुरावा झाल्यानंतर
नाफेडने ३१ मे रोजी हरभरा खरेदी पूर्ववत सुरू केली. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत २ जून रोजी हरभरा खरेदी बंद केली. त्यामुळे भिवापूर तालुक्यातील जवळपास ४०० शेतकऱ्यांचा हरभरा घरात पडून आहे.तर जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अंदाजे ५ हजाराच्या घरात आहे.दरम्यान नाफेडने खरेदीच्या उद्दिष्टात वाढ करीत, बुधवारपासून (दि. १५) हरभरा खरेदी पुन्हा सुरु केली. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Bhivapur live updates's Album: Wall Photos


0 comments