Photo 551 of 571 in Wall Photos

Pin It
लघुपटाद्वारे स्वच्छतेचा जागर

विद्यार्थ्यामध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता व्हावी, या उद्देशाने रामजी महाजन देशमुख नगर परिषद विद्यालयात 'लेट्स चेंज' हा लघु चित्रपट दाखविण्यात आला. शाळेच्या अटल ट्रिंकलिंग लॅब सभागृहात शिक्षक सुनील पवार, मुकेश भांडारकर, संदीप दामोदर, दीपक बांगडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रोहित आर्या दिग्दर्शित लेट्स चेंज हा लघुपट स्वच्छता मोहिमेवर आधारित आहे. यात गुजरातमधील एका शहरात विद्यार्थी स्वच्छता मोहीम राबवून एक प्रोजेक्ट तयार करतात. त्याचे चांगले परिणाम मिळाले, असे दाखविण्यात आले. राज्य शासन हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवीत असून, शिक्षणमंत्र्यांनी हा लघु चित्रपट सर्व शाळांमध्ये दाखविण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर बनतील व जनजागृती होईल.

Umred live updates's Album: Wall Photos


0 comments