Photo 550 of 571 in Wall Photos

Pin It
२४ तासांत दोन आत्महत्या

: २४ तासांत नागपुरात दोन आत्महत्यांची नोंद झाली. हुडकेश्वर व वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. पहिली घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. महाविष्णू नगर येथे राहणारे राजेश वामनराव निखारे (५७) यांनी यांनी राहते घरी सिलिंग फॅनला साडीने गळफास घेतला. त्यांना उपचारासाठी मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पत्नीच्या सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दुसरी घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सोनबा नगर, वाडी येथे राहणारे अमित विजय बोरकर (२५) यांनी राहते घरी सिलिंगच्या हुकला दुपट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आईच्या सूचनेवरून वाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Umred live updates's Album: Wall Photos


0 comments