Photo 549 of 571 in Wall Photos

Pin It
एक लाखांच्या कर्जाच्या नादात ९९ हजार गमावले

एक लाख रुपयांचे कर्ज मिळेल, या आमिषाला फसल्याने एका तरुणाला ९९ हजार रुपये गमवावे लागले. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. संकेत शामसुंदर आवडे (३१. शांतीनगर) यांचे युनियन बँक ऑफ इंडियाच्या सदर शाखेत खाते आहे. ते नियमित खात्यातून व्यवहार करतात. त्यांना अज्ञात आरोपीने ०७१२-२५२३५१ या क्रमांकावरून फोन केला व त्यांना १ लाखांचे कर्ज त्वरित मिळू शकते, अशी बतावणी केली. संकेत यांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला व समोरील व्यक्तीवर त्यांनी विश्वास ठेवला. आरोपीने संकेत यांच्याकडून बँक खात्याचे तपशील मागितले व त्यांनीही ते त्याला दिले. काही वेळातच आरोपीने त्यांच्या खात्यातून ९८ हजार ९८७ रुपये काढले. या संदर्भातील एसएमएस येताच, संकेत यांना धक्का बसला. त्यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात फसवणूक, तसेच आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Umred live updates's Album: Wall Photos


0 comments